
अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood) अल्पवधीच कियाराने तिच्या अॅक्टींगच्या (acting) जोरावर मोठी प्रसिध्दी मिळवली आहे. 2014 मध्ये फगली (Fugly) या सिनेमात डेब्यू करत कियाराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाला फारसं यश मिळालं नसलं तर अभिनेत्री म्हणून कियाराने बॉलिवूडमध्ये आपली छाप नक्कीच सोडली होती.त्यानंतर कियाराने बरेच दक्षिणात्य सिनेमा (Tollywood) गाजवले आणि बघतात बघता ती साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिध्द अभिनेत्री म्हणून उदयास आली. बॉलिवूडमध्ये कियाराला खरा एक्सपोझर मिळाला तो एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी (M S Dhoni The Untold story) या महेंद्रसिंह धोनीच्या (Mahesndra Singh dhoni) बायोपिक मधून. यात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) बरोबर दिसून आली तर सिनेमात तिने एम एस धोनीची बायको म्हणजेच साक्षी धोनीची (Sakshi Dhoni) भुमिका निभवली. या सिनेमातून अभिनेत्री कियारा अडवाणीची बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण झाली.
अभिनेत्री कियारा अडवाणीचं (Kiara Advani) खरं नाव कियारा नसुन आलिया आहे. पण बॉलिवूडमध्ये पूर्वीच एक आलिया (Alia) म्हणजे अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) असल्याने स्वतच नाव आलिया अडवाणी (Alia Advani) असं न ठेवता कियारा अडवाणी असं ठेवलं. तर सिनेसृष्टीत ती कियारा याचं नावाने वावरु लागली. आज बरेच लोकांना हे माहिती देखील नाही की अभिनेत्री कियारा अडवाणीचं खरं नावं कियारा अडवाणी नसून ते आलिया अडवाणी आहे. (हे ही वाचा:-Vikrant Rona Box Office Collection: 'किच्चा सुदीप'च्या 'विक्रांत रोना'ची जादू प्रेक्षकांवर चालली, पहिल्या दिवसीच केली जबरदस्त कमाई)
अभिनेत्री कियारा अडवाणीने सुपर हिट बॉलिवूड सिनेमे (Super Hit Bollywood Movies) दिलेत. कियाराच्या नुकत्याच आलेल्या दोन सिनेमा भुलभुलैया २ (Bhul Bhulaiya 2) आणि जुग जुग जियो (Jug Jug Jiyo) या चित्रपटांनी 100 कोटींच्या घरात कमाई केली. तर यापूर्वीही शेरशाह (Shershaah), कबीर सिंह (Kabir Singh), गुडन्यूज (Good News), एम एस धोनी, लक्ष्मी (Laxmi) सारखे अनेक सुपर हिट सिनेमा दिलेत. आज कियारा बॉलिवूडच्या सुप्रसिध्द अभिनेत्रींपैकी एक आहे.