Gulabi Saree : सद्या सोशल मीडियावर 'गुलाबी साडी' या गाण्याचं ट्रेन्ड सुरु आहे. हेच गाणं आता सातासमुद्रपार गेल्याचे दिसत आहे. संजू राठोडचं 'गुलाबी साडी' या गाण्याचा पोस्टर न्युयॉर्क येथील टाईम स्क्वेअरच्या बिलबोर्डावर झळकलं आहे. गुलाबी साडी या गाण्यांवर नेटकरीच नाही तर बॉलिवूडच्या दिग्गज कलाकार देखील थिरकत आहे. या गाण्यांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ वाढली आहे. हेही वाचा- ऑस्कर विजेतं 'जय हो' गाणं ए.आर रेहमानचं नाहीच! राम गोपाल वर्मा यांचा मोठा दावा
संजू राठोड यांने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात कॅप्शन लिहलं आहे की, "लोकल चार्म ते ग्लोबल फेम, गुलाबी साडी न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकली. #GulabiSadi #SanjuRathod #BelieveArtistServices असे हॅशटॅग वापरले आहे. या मराठी गाण्याने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
संजूने या आधी गायलेल्या गाण्यांना देखील लाखोंचे व्हूज मिळाले आहेत. संजूने नुकतच नवीन गाणं सोशल मीडियावर रिलीज केलं आहे. गुलाबी साडी हे गाणं फेब्रुवारी २०२४ ला सोशल मीडियावर रिलीज झालं होते.त्यानंतर अनेकांनी या गाण्यावर रिल्स काढण्यास सुरुवात केली. या गाण्यात मुख्य भुमिकेत संजू राठोड आणि प्राजक्ता हे दोघेही आहेत. संजूने गायलेले हे गाण आता सातासमुद्रपार गेल्यामुळे त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.