Ram Gopal Varma: ऑस्कर विजेतं 'जय हो' गाणं ए.आर रेहमानचं नाहीच! राम गोपाल वर्मा यांचा मोठा दावा
Ram Gopal Varma

'जय हो' (Jai Ho) हे गाणं आजही तितकचं पसंतीस उतरतं. 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटामधील हे गाणं ए.आर रेहमान (A.R Rehman) यांनी संगीतबद्ध केलं होतं. त्यावेळी या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळाली होती.  पण नुकतच या गाण्याबबात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी मोठा  दावा केला आहे.  या गाण्याची ट्यून सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी तयार केले असल्याचे राम गोपाळ वर्मा यांनी केले आहे. (हेही वाचा -  Rinku Rajguru Trolled: डिप नेक गाऊनमध्ये रिंकू राजगुरु हिला पाहून चाहते 'सैराट'ले; सोशल मीडियावर ट्रोल)

दिग्दर्शक सुभाष घई यांनी ए.आर रेहमानला युवराज या चित्रपटासाठी साईन केलं होतं. पण त्याचवेळी एका संगीताच्या ट्युनमुळे ए.आर रेहमान आणि सुभाष घई यांच्या कडाक्याचं भांडण झालं.  जेव्हा सुभाष घई यांनी रेहमानला संगीत तयार करण्यास सांगितले, तेव्हा त्याला इतर कामांमुळे ते जमले नाही. संगीत तयार करायला उशीर झाला आणि सुभाष घई रेहमानवर बरेच चिडले. त्यावेळी रेहमान लंडनला होते आणि त्यांनी सुखविंदरला एका गाण्याची ट्युन तयार करण्यास सांगितली.

पुढे ए.आर रेहमानने 2008 मध्ये तीच ट्युन 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी वापरली आणि त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. पण मुळात ती ट्युन सुखविंदर सिंगने तयार केली होती, असा मोठा खुलासा राम गोपाल वर्मा यांनी केला आहे.  दरम्यान या ट्यून वरुन एआर रेहमान, सुखविंदर सिंद आणि सुभाष घई यांच्यामध्ये मोठा वाद देखील झाला आहे.