Google Celebrats Madhubala birthday with doodle (Photo Credit: Google)

Google Celebrats Madhubala Birthday With Doodle: बॉलिवूडची सौंदर्यवती आणि दिग्गज अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांचा आज जन्मदिवस. 14 फेब्रुवारी 1933 साली मधुबाला यांचा जन्म दिल्लीत झाला. घायाळ करणारे सौंदर्य, मोहक हास्य, दमदार अभिनय आणि दिलखेचक अदा यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मधुबाला यांना बॉलिवूडची मर्लिन मुनरो असे देखील म्हटले जाते. व्हेलेंटाईन डे दिवशी जन्मलेल्या मधुबाला यांना जन्मदिवसानिमित्त गुगलने खास डुडल साकारत मानवंदना दिली आहे. गुगल डुडलवर मधुबाला यांचा सुपरहिट सिनेमा 'मुगल-ए-आजम' मधील 'अनारकली'ची झलक पाहायला मिळत आहे. Google ने जगभरातील सर्व प्रेमीकांसाठी अर्पण केले आजचे रोमँटीक Doodle

मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी होते. त्यांनी अवघ्या 9 वर्षी 'बसंत' सिनेमातून आपल्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र त्यांना खरी ओळख दिली ती 1947 साली आलेल्या राज कपूर यांच्या 'नील कमल' सिनेमाने. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाले. कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने मधुबाला यांनी लहान वयातच कामाला सुरुवात केली.

मधुबाला यांना करिअरमध्ये मोठे यश लाभले. मात्र त्यांचे खाजगी आयुष्य अडीअडचणींनी भरलेले होते. त्यामुळे त्यांना 'ट्रेजडी क्वीन' देखील म्हटले जाते. मधुबाला यांनी अभिनेता किशोर कुमार यांच्या सोबत विवाह केला. मात्र आजारी पडल्यावर त्या एकट्या पडल्या. आजारपणाच्या या काळात किशोर कुमार 2 महिन्यातून एकदा त्यांना भेटायला येत असतं.

मधुबाला यांच्या जीवनातील शेवटची काही वर्ष खूप कठीण गेली. मधुबाला यांच्या हृदयाला छिद्र होते. त्यामुळे त्यांची अनेक वर्षे आजारपणात गेली. अखेर 23 फेब्रुवारी 1969 साली त्यांचे निधन झाले.

'महल', 'दुलारी', 'अमर', 'चलती का नाम गाडी', 'हावडा ब्रिज', 'मुगल-ए-आजम' यांसारख्या लोकप्रिय सिनेमात मधुबाला यांनी काम केले आहे.