सौंदर्याची खाण आणि अभिनयाचे अमूल्य वरदान मिळालेल्या दिवंगत अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांची आज पुण्यतिथी. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम नहलवी. मात्र बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. तिच्या मनमोहक अदा, निखळ हास्य आणि दमदार अभिनय या कलागुणांमुळे तिची जगाला अवघ्या काही काळातच भुरळ पडली. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला' असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते.
'जब प्यार किया तो डरना क्या', 'आइये मेहरबान' यांसारखी त्यांची अजरामर झालेली गाणी आजही लोक गुणगुणताना दिसतात. या प्रत्येक गाण्यातील त्यांची अदा तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करायची.
पाहूयात अशी त्यांची 5 सदाबहार गाणी:
जब प्यार किया तो डरना क्या:
आइये मेहरबान:
हाल कैसा है जनाब का:
हेदेखील वाचा- Madhubala Death Anniversary: अन् मधुबाला-दिलीप कुमार यांच्या नात्यात दुरावा आला!
अच्छा जी मैं हारी
तेरी मैफिल में किस्मत:
19 व्या शतकात तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या घराबाहेर, शूटिंग ठिकाणी एकच गर्दी करायचे. मधुबाला जितकी गुणी कलाकार होती तितकीच माणून म्हणूनही ती खूप खूप प्रेमळ आणि निरागस होती. अशी सौंदर्यवती पुन्हा होणे ही एकच गोष्ट आज त्यांच्या पुण्यतिथिनिमित्त बोलावीशी वाटते. 23 फेब्रुवारी 1969 त्यांचे निधन झाले. अशा या गुणवंत आणि अष्टपैलू अभिनेत्रीला लेटेस्टली मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली!