चित्रपटसृष्टीत बरेच बायोपिक सध्या बनत आहेत अन् आणखी काही बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कंगनाच्या ‘एमर्जन्सि’ या इंदिरा गांधी यांच्यावर बेतलेल्या बायोपिकची सध्या चांगलीच चर्चा आहे. इतरही काही विषयांवर काम सुरू आहे. मध्यंतरी अभिनेत्री मधुबालावरील बायोपिकची चर्चासुद्धा चांगलीच रंगली होती. आता नुकतंच याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जसमीत के रीन यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनने या चित्रपटाची घोषणा केली आहे. याबरोबरच मधुबाला यांची बहीण मधुर ब्रीज भूषण या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. (हेही वाचा - Bastar Review: 'बस्तर: द नक्षल स्टोरी' दाखवते नक्षलवादाचे कटू सत्य, जाणून घ्या, कथा आणि इतर माहिती)
सोनी पिक्चर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. मध्यंतरी प्रसिद्ध फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रा हा बायोपिक करणार असून क्रीती सेनॉन यात मधुबाला यांची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर आले होते. पण ती अफवा असल्याचे समोर आले.
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
पण मधूबालाविषयी माहिती नसलेल्या गोष्टी आम्हाला लोकांसमोर आणायला आवडेल. हा बायोपिक बनवण्यासाठी मी पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायला तयार आहे. मी आणि माझी टीम यावर काम करत आहोत, लवकरच याबद्दल अधिकृती घोषणाही करू. आम्ही सध्या यासाठी बरीच मेहनत घेत असल्याचे मधुर ब्रीज भूषण यांनी म्हटले आहे.