Good Newwz Poster: दोन गर्भवती महिलांमध्ये फसलेल्या अक्षय कुमार आणि दिलजीत दौसांझ याच्याकडे 'गुड न्यूज'?
Good Newwz Poster Launched (Photo Credits-Twitter)

अक्षय कुमार (Akshay Kumar) हा दोन गर्भवती महिलांमध्ये फसला असून त्याच्याकडे लवकरच 'गुड न्यूज' (Good Newwz) असणार असल्याची चर्चा आता जोरदार सुरु झाली आहे. ही गुड न्यूज त्याच्या घरी नाही तर त्याचा आगामी चित्रपटातून दिसून येणार आहे. गुड न्यूज या चित्रपटाचा पोस्टर नुकताच रिलिज करण्यात आला. त्यामध्ये दोन गर्भवती महिला सुद्धा दिसून येत असून त्यापैकी एक करिना कपूर (Kareena Kapoor) आणि दुसरी म्हणजे कियारा अडवणी (Kiara Advani) आहे. या चित्रपटाचे पोस्टर अक्षय कुमार याने ट्वीट केले आहे.

अक्षय याचा गुड न्यूज या चित्रपटाला गुफ-अप-ऑफ-द इयर असा टॅग दिला आहे. हा चित्रपट क्रिसमसच्या वेळी म्हणजेच 27 डिसेंबरला प्रेक्षकांना पहाता येणार आहे. रिलिज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एका बाजूला करिना कपूर आणि दुसऱ्या बाजूला कियारा अडवाणी दिसून येत आहे. या दोन्ही अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करत असून त्यांच्यामध्ये दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि अक्षय कुमार फसलेले दिसत आहेत.(Shikhar Dhawan च्या अंगात जेव्हा Akshay Kumar शिरतो; पाहा काय घडतं त्यानंतर)

Tweet:

या चित्रपटात अक्षय कुमार आणि करिना कपुरची जोडी पुन्हा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यापूर्वी हे दोघे 2009 मध्ये आलेला चित्रपट कमबख्त इश्क मधून झळकले होते. गुड न्यूज या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन यांनी केली आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाची कथा सरोगेसी मुद्द्यावर असणार आहे. सरोगेसी या विषयावर यापूर्वी 2002 मध्ये 'फिलहाल' नावाचा चित्रपट आला होता. त्याचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले होते.