Shikhar Dhawan च्या अंगात जेव्हा Akshay Kumar शिरतो; पाहा काय घडतं त्यानंतर
File Picture of Indian actor Akshay Kumar (Photo Credits: IANS)

 

शिखर धवनची (Shikhar Dhawan) मजेशीर बाजू आपल्याला कायमच दिसत असते. त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून त्याच्यामध्ये दडलेल्या मस्तीचं प्रदर्शन नेहमी होत असतं. बांगलादेशविरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यानंतर सुद्धा असाच एक व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. ज्यामध्ये त्याने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नुकत्याच आलेल्या 'हाऊसफुल्ल 4' मधील पात्राचा अभिनय केला आहे.

अक्षय कुमार आणि शिखर धवन मधील अजून एक साम्य म्हणजे 'गब्बर'. अक्षयचा गब्बर हा चित्रपट हिट झाला होता. तर दुसरीकडे शिखर धवनला गब्बर या टोपणनावाने सगळेच ओळखतात. या गब्बरने इन्स्टा वरील व्हिडिओमध्ये अक्षयच्या पात्राच्या विसरभोळेपणाची नक्कल करताना धमाल उडवून दिली आहे. हाऊसफुल्ल 4 मध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज कोणापाशी झाला की अक्षयच्या पात्राला विसरण्याचा अटॅक येतो. तीच खुबी धवनने या व्हिडिओमध्ये वापरली आहे. (हेही वाचा. मुलांसह रितेश देशमुख घालतोय 'बाला बाला' या गाण्यावर धिंगाणा, पाहा संपूर्ण व्हिडिओ)

 

 

View this post on Instagram

 

Bala ke side effects 😂 @akshaykumar @khaleelahmed13 @yuzi_chahal23

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

धवनचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर खूप व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर त्यावर भुवनेश्वर कुमारने केलेली कमेंट सुद्धा तितकीच मजेशीर आहे. भुवी म्हणतो,'यासाठी आवाजाची काय गरज? धवन तर तसाही विसरभोळाच आहे.'

भारत सध्या बांगलादेशविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळात आहे. तिचा निर्णायक तिसरा सामना आज खेळला जाईल. पहिला सामना बांगलादेशने तर दुसरा भारताने जिंकला होता.