Gadar 2: Ameesha Patel आणि Sunny Deol 'गदर 2' साठी पुन्हा एकत्र; समोर आले चित्रपटाचे मोशन पोस्टर (Watch Video)
Gadar 2 (Photo Credit : Instagram)

2001 मध्ये रिलीज झालेला 'गदर: एक प्रेम कथा' (Gadar: Ek Prem Katha) हा चित्रपट क्वचितच कोणी पाहिला नसेल. या चित्रपटात एकीकडे भारत आणि पाकिस्तानची फाळणी दाखवण्यात आली होती, तर दुसरीकडे सकीना आणि तारा यांच्या सुंदर प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटात अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) सकीना आणि सनी देओल (Sunny Deol) तारासिंगच्या भूमिकेत होते. आता तब्बल 20 वर्षांनंतर, अमीषा पटेल आणि सनी देओलची सुपरहिट जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर ‘गदर 2’ (Gadar 2) च्या रूपाने अवतरणार आहे.

अमिषा पटेल आणि सनी देओल 'गदर 2' च्या सिक्वलमध्ये एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक अनिल शर्मा या गदर चित्रपटाचा पुढील भाग बनवणार आहेत, ज्याची अधिकृत घोषणा आज, 15 ऑक्टोबर रोजी केली गेली. त्याच्या एक दिवस आधी चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक दोघांनीही सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. अमिषा पटेलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरबाबत लिहिले आहे की, ‘कथा पुढे जाईल’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

आता, दोन दशकांनंतर प्रतीक्षा अखेर संपली असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सिक्वेलची घोषणा झाली. आहे. टीमने गदर 2 चे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. गदरचा दुसरा भाग पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. सनी देओल सोबत, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. उत्कर्ष शर्मा हा तोच कलाकार आहे जो गदरमध्ये अमीषा आणि सनीच्या मुलाच्या रुपात दिसला होता. उत्कर्ष दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. (हेही वाचा:  'स्पेशल ऑप्स' च्या दुसर्‍या सीझनपूर्वीच स्पिन ऑफ सीज़न 'स्पेशल ऑप्स 1.5- द हिम्मत स्टोरी' चं ऐलान; Kay Kay Menon मुख्य भूमिकेत)

या मोशन पोस्टरनंतर आता चाहत्यांना उत्सुकता आहे की गदर 2 मध्ये कोणती कथा पहायला मिळणार आहे. दरम्यान, जगातील इतर कोणत्याही चित्रपटाच्या तुलनेत गदरची 10 कोटी तिकिटे विकली गेली होती, व हा एक जागतिक विक्रम आहे. गदर चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक समजला जातो. सकीनाच्या भूमिकेसाठी आधी काजोल, मनीषा कोईराला, सुष्मिता सेन, करीना कपूर, ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी अशा अनेक अभिनेत्रींना विचारण्यात आले होते, मात्र सर्वांनी नकार दिल्यानंतर शेवटी आमिषाने हा चित्रपट स्वीकारला.