कोट्यावधी रुपये खर्चून बनवलेला साहो 'या' फ्रेंच चित्रपटाची कॉपी?; दिग्दर्शकाने केला चोरीचा आरोप (पहा ट्विट)
साहो आणि लार्गो विंच (संग्रहित संपादित प्रतिमा)

चित्रपटाबाबत समीक्षकांकडून आलेल्या नकारात्मक अभिप्रायांनंतरही प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला साहो (Saaho) सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान चालत आहेत. रिलीजच्या दिवशीच या चित्रपटावर शिलो शिव सुलेमान (Shilo Shiv Suleman) या कलाकाराने चोरी केल्याचा आरोप केला होता. चित्रपटामधील बॅक ड्रॉप, रंग पॅलेट आणि चित्रपटाच्या एका पोस्टरमधील काही कंटेंट हा शिलोच्या ‘बर्निंग मॅन फेस्टिव्हल’मधील कामाशी मिळता जुळता आहे असा तिचा आरोप होता. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर एका फ्रेंच दिग्दर्शकाने हा चित्रपट त्याच्या एका चित्रपटाची कॉपी असल्याचे म्हटले आहे.

Jérôme Salle दिग्दर्शकाने ट्विटरवर म्हटले आहे की, साहो चित्रपट त्याच्या लार्गो विंच (Largo Winch) या चित्रपटाचा 'फ्रीमेक' आहे. सुरुवातीला Jérôme ने ‘आपल्याला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये उत्तम संधी असल्याचे' एक मजेशीर ट्विट केले होते. मात्र त्यानंतर अजून एक ट्विट करत त्याने साहो चित्रपटावर टीकास्त्र सोडले.

Jérôme Salle  याचे ट्विट - 

आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो ’साहो हा लार्गो विंचचा हा दुसरा ‘फ्रीमेक’ पहिल्यासारखाच अतिशय वाईट आहे असे दिसते. तर कृपया तेलुगू दिग्दर्शकांनो, जर तुम्हाला माझे कामच चोरायचे होते, तर किमान ते योग्य प्रकारे तरी चोरायचे. माझे ‘भारतीय करिअर’बाबतचे ट्वीट नक्कीच उपहासात्मक होते.’ (हेही वाचा: नकारात्मक प्रतिक्रिया मिळूनही, हजारो रुपयांना विकले जात आहे 'प्रभास'च्या साहोचे एक तिकीट; विकत घेण्यासाठी अनेक किलोमीटरच्या रांगा (Video))

Jerome Salle ने याधीही आपल्या चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप केला होता. याआधी पवन कल्याणचा त्रिविक्रम (Trivikram) दिग्दर्शित ‘अग्न्याथवासी’ (Agnyaathavasi) हा चित्रपटही लार्गो विंचची फ्रेम बाय फ्रेम कॉपी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. असो असे अनेक आरोप अनेक चित्रपटांवर होत राहतात मात्र त्याचा चित्रपटाच्या कमाईवर म्हणावा असा परिणाम होत नाही. सोहोने देखील प्रदर्शनाच्या पहिल्या वीकएंडला 79 कोटी रुपयांची कमाई केली आहे.