Prabhas and Shraddha Kapoor in Saaho (Photo Credits: UV Creations)

दक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) याचा बहुप्रतीक्षित आणि महत्त्वाकांक्षी अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपट 'साहो' (Saaho) 30 ऑगस्ट म्हणजे आज, थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) दक्षिणेमधील चित्रपटांत एन्ट्री करत आहे. दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट परदेशात दाखवण्यात आला. तिथे या चित्रपटाला अनेक नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर आज भारतामध्येही या चित्रपटाबाबत लोकांची फर्स्ट रिअॅक्शन तितकीशी चांगली नाही. अनेक माध्यमांनी या चित्रपटाला अडीच पेक्षा कमी रेटिंग दिले आहे. असे असूनही या चित्रपटाची तिकिटे (Sahoo Film Ticket) हजारो रुपयांना विकली जात आहेत.

दिल्लीतील अनेक थिएटरमध्ये हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. हैदराबादमध्येतर तिकिटांसाठी अनेक किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या आहेत. सध्या दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या एका शोचे ऑनलाईन तिकीट तब्बल 2200 रुपयांना विकले जात आहेत. ते घेण्यासाठीही चाहत्यांचा उड्या पडत आहेत. या चित्रपटाचे बजेट तब्बल 350 कोटी इतके होते. मात्र परदेशात अनेक लोकांनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही समीक्षकांनी या चित्रपटाचा ‘बोअरिंग’ असा उल्लेख केला आहे. (हेही वाचा: (हेही वाचा: 'साहो' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज! प्रभास च्या रुपात लवकरच लाँच होणार 'Saaho The Game')

मात्र कोणी काही म्हणो, बाहुबली फेल प्रभासची हवा वेगळीच आहेत. त्यात साउथमध्ये तर प्रभासचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे रीव्युज काहीही असो, हा चित्रपट बॉक्स ऑफिस आपली कामाल दाखवनार हे निश्चित. सुजितच्या दिग्दर्शनाखाली बनविला गेलेला साहो हा 2019 चा सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभासने या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतले आहे. या चित्रपटात मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.