'साहो' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज! प्रभास च्या रुपात लवकरच लाँच होणार 'Saaho The Game'
Saaho Game (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला 'साहो' (Saaho) चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. बाहुबली फेम प्रभास (Prabhas)आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची प्रमुख भूमिका असलेला साहो हा चित्रपट हा या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट असेल असे सांगण्यात येत आहे. त्याच्या पोस्टर पासून ते गाण्यांपर्यंत येणा-या रोजच्या बातम्यांमुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. लोकांची ही उत्सुकता अशीच कायम ठेवण्यासाठी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक मोठं सरप्राईज आणलं आहे. हे सरप्राईज म्हणजे या चित्रपटासोबतच या त्याचे गेम व्हर्जनसुद्धा येणार आहे. नुकताच या गेमचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या अधिकृत पेजसह अभिनेता प्रभासने आपल्या इन्स्टा अकाउंटवर हा पोस्टर शेअर केला आहे.

प्रभासने आपल्या सोशल अकाउंटवर 'साहो द गेम' (Saaho; The Game) चा पोस्टर शेअर करुन त्याखाली "या गेमच्या माध्यमातून माझे अॅक्शन्स बघण्यासाठी तयार व्हा' असे म्हटले आहे.

साहो या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणा-या चाहत्यांना हा गेम नक्कीच आवडेल, असा विश्वास या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे. या पोस्टरमध्ये प्रभास खूपच प्रभावशाली दिसत असून त्याच्यासमोर फायटर्स बंदूके घेऊन उभे आहेत, असे दिसत आहे.

हेही वाचा- Saaho Song 'Psycho Saiyaan': अखेर साहो चित्रपटाचे पहिले गाणे 'सायको सैयां' आले प्रेक्षकांच्या भेटीला, श्रद्धा कपूर आणि प्रभास ची पाहायला जबरदस्त केमिस्ट्री

साहो चित्रपटात अभिनेता नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासारखे कलाकार मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून निर्मिती केली आहे. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.