Saaho Song 'Psycho Saiyaan': अखेर साहो चित्रपटाचे पहिले गाणे 'सायको सैयां' आले प्रेक्षकांच्या भेटीला, श्रद्धा कपूर आणि प्रभास ची पाहायला जबरदस्त केमिस्ट्री
Psycho Saiyaan Song in Saaho (Photo Credits: YouTube)

बाहुबली फेम प्रभास सध्या चर्चेत आहे ती त्याच्या आगामी चित्रपट 'साहो' (Saaho) मुळे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि यातील अॅक्शन सीन्स पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता अजूनच शिगेला पोहोचली आहे. त्यातच भर म्हणून या चित्रपटातील 'सायको सैयां' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या गाण्यात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि प्रभास (Prabhas) ची जबरदस्त केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुजित या चित्रपटाचे दिग्दर्शक असून वाम्सी आणि प्रमोद हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हे गाणे धन्वी भानुशाली आणि सचेत टंडन यांनी गायले असून तनिष्क बाग्ची ने हे गाणे लिहिले आहे. गुलशन कुमार आणि भूषण कुमार निर्मित UV Creations सह T-Series चे ह्या गाण्याची निर्मिती केली आहे.

5 जुलैला या गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला होता. त्याला काही क्षणातच प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ह्या गाण्याची उत्सुकताही तितकीच वाढली होती. ह्या गाण्यामध्ये श्रद्धा कपूर आणि प्रभास बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

हेही वाचा- साहो चित्रपटातील 'सायको सैयां' गाण्याचा टीजर प्रदर्शित, गाण्यात पाहायला मिळणार प्रभास आणि श्रद्धा कपूर ची जबरदस्त केमिस्ट्री

साहो चित्रपटात अभिनेता नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासारखे कलाकार मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून निर्मिती केली आहे. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.