Psycho Saiyaan Teaser (Photo Credits: YouTube)

बहूचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'साहो' (Saaho )चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या ट्रेलर आणि त्यातील अॅक्शन सीन्समुळे बराच चर्चेत आहे. त्यातच आज या चित्रपटातील एक गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला आहे. 'सायको सैया' (Psycho Saiyaan)  असे या गाण्याचे नाव असून या गाण्यामध्ये श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि प्रभास (Prabhas) बेभान होऊन थिरकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.

या गाण्याचा टीजर श्रद्धा कपूर आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात श्रद्धा हिरव्या रंगाच्या शिमर ड्रेसमध्ये भन्नाट मूव्ह करताना दिसत आहे. यात श्रद्धा खूपच हॉट दिसत आहे.

तर प्रभास ने काळ्या रंगाचा आउटफिट घातले आहे. 28 सेकंदाच्या या टीजरमध्ये गाण्याचा बोल जास्त ऐकायला मिळत नाही. मात्र याचे संगीत खूपच वेगळे आणि उत्साहवर्धक वाटत आहे. हे गाणे भानुशाली याने गायिले आहे. तर तनिष्क बाग्ची गाण्याचे संगीतकार आहे.

हेही वाचा- श्रद्धा कपूर हिच्या वाढदिवासावेळी प्रदर्शित झाला 'साहो' चित्रपटाचा टीझर, प्रभास सोबत करणार जबरदस्त धमाका (Video)

साहो चित्रपटात अभिनेता नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासारखे कलाकार मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून निर्मिती केली आहे. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.