आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकीतच निवृत्ती घेतलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार (Former Captain Of Indian Cricket Team ) , क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आता मनोरंजन क्षेत्रात फलंदाजी करताना दिसणार आहे. होय, महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आता पौराणीक किंवा ज्याला दंतकथा म्हणून ओळखल्या जाता अशा कथानकांवर वेब सीरीज (Mythological Sci-fi Web-Series) बनवणार आहे.
आतापर्यंतचा इतिहास पाहता निवृत्ती घेतलेले बहुतांश क्रिकेटपटू हे समालोचन करताना दिसतात. अथवा एखादी अॅकेडमी काढून होतकरु आणि नवोदीत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतात. आपण गाजवलेल्या क्षेत्रात निवृत्ती घेतल्यावर भलत्याच क्षेत्रात कार्यरत होणाऱ्या क्रिकेटपटूंची वानवा आहे. अर्थात राजकारण, हॉलेलींग अशा क्षेत्रात ही मंडळी आढते. नाही असे नाही. पण तीतकीच. (हेही वाचा, CSK vs DC आयपीएल सामन्यात एमएस धोनीने पुन्हा दाखवली चपळता, अफलातून कॅच घेत श्रेयस अय्यरला धाडलं माघारी (Watch Video))
महेंद्र सिंह धोनी यानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑगस्ट 2020 मध्ये निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने मनोरंजन क्षेत्रात कार्यरत होण्याचे ठरवले आहे. अर्थात मनोरंजन क्षेत्र हे धोनीसाठी नवे राहिले नाही. Dhoni Entertainment या बॅनरखाली "रॉर ऑफ द लायन" (Roar of the Lion) नावाच्या एका Documentary Drama मधून त्याने 2019 मध्येच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते.
दरम्यान, प्रॉडोक्शन हाऊसची व्यवस्थापकीय संचालक साक्षी धोनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, आगामी वेब सिरीज ही थरारक आहे. जी एका पौराणिक पुस्तकावर आधारीत आहे. या पुस्तकात विज्ञान, तंत्रज्ञान आणि रहस्यमय कथांचा समावेश आहे. यात काही दंतकथा आणि अघोरी कथानकांचा समावेश आहे.
कबीर खान यांनी म्हटले आहे की, "Roar of the Lion" च्या माध्यमातून एम. एस. धोनी यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) इंडियन प्रीमियर लिग (IPL) पुनगागमन करत आहे. दरम्यान, धोनी आता एका अप्रकाशित पुस्तकाच्या आधारे आपल्या दुसऱ्या वेबसीरीजचे प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.