प्रियांका चोप्रा आणि निक जोनस (Archived, edited, images)

'मदर्स डे' (Mother’s Day) हा दिवस सर्वांसाठीच खूप खास असतो, मात्र यंदाचा मातृदिन बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका (Priyanka Chopra) चोप्रासाठी खूपच अविस्मरणीय ठरला. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आणि निक जोनास नुकतेच एका मुलीचे पालक झाले आहेत. मात्र या जोडप्याची मुलगी जन्मापासून रुग्णालयातच होती. आता अखेर 100 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रियंका-निकची मुलगी घरी आली आहे. आपल्या मुलीच्या घरी परतण्याचा आनंद या जोडप्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. रविवारी उशिरा, प्रियांका आणि निक जोनास यांनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

या फोटोमध्ये निक आणि प्रियांका एकत्र बसले आहेत व त्यांची मुलगी मालती प्रियांकाच्या मांडीवर दिसत आहे. मालती मेरी चोप्रा जोनासची पहिली झलक शेअर करताना प्रियांकाने लिहिले आहे, ‘या मदर्स डेला आम्ही गेल्या काही महिन्यांतील रोलरकोस्टर सारख्या चढ-उतारांबाबत विचार करत होतो. फक्त आम्हीच नाही तर इतर अनेकांनी असा अनुभव घेतला असेल NICU मध्ये 100 पेक्षा जास्त दिवस घालवल्यानंतर, आमची छोटी परी शेवटी घरी आली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

ती पुढे म्हणते, ‘प्रत्येक कुटुंबाचा प्रवास वेगळा असतो आणि त्यासाठी विश्वासाची गरज असते. गेले काही महिने आमच्यासाठी आव्हानात्मक होते. मागे वळून पाहताना प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे हे स्पष्ट होते. आम्ही खूप आनंदी आहोत की आमची लहान मुलगी शेवटी घरी आली आहे. लॉस एंजेलिसमधील रेडी चिल्ड्रन्स ला जोला आणि सेडर्स सिनाई हॉस्पिटलमधील प्रत्येक डॉक्टर, परिचारिका आणि तज्ञांचे आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो. आमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय सुरू होणार आहे.’ (हेही वाचा: कतरिना कैफ आणि विकी कौशल स्विमिंग पूलमध्ये दिसले रोमँटिक अंदाजात; अभिनेत्रीने शेअर केला हटके फोटो)

दरम्यान, प्रियांका आणि निकचे डिसेंबर 2018 मध्ये भारतात लग्न झाले होते. या वर्षी जानेवारी महिन्यात हे दोघेही सरोगसीच्या माध्यमातून पालक झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मुलीच्या जन्माची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती व आता मुलगी घरी परतल्याची माहिती त्यांनी चाहत्यांना दिली आहे.