Katrina Kaif-Vicky Kaushal Photo: कतरिना कैफ आणि विकी कौशल स्विमिंग पूलमध्ये दिसले रोमँटिक अंदाजात; अभिनेत्रीने शेअर केला हटके फोटो
अलीकडेच कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्रामवर पतीसोबतचा एक अतिशय रोमँटिक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री दिसून येत आहे.
Katrina Kaif-Vicky Kaushal Photo: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. बरेच दिवस अफेअर लपवून ठेवल्यानंतर विकी आणि कतरिनाने 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता दोघेही अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे सुंदर रोमँटिक फोटो शेअर करत असतात. दरम्यान, अलीकडेच कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्रामवर पतीसोबतचा एक अतिशय रोमँटिक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री दिसून येत आहे.
या फोटोमध्ये कतरिना आणि विकी स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. अभिनेत्रीने विकीला घट्ट मिठी मारली असून विकीने पत्नीलाही कंबरेला धरले आहे. दोघेही कॅमेराकडे बघत पोझ देताना दिसत आहेत. सध्या या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

