प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) हिचा ओटीटी प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजी (ALT Balaji) वर एक वेब सीरिज प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामध्ये अश्लीलता पसरवणे आणि धार्मिक भावना दुखावण्यासह राष्ट्रीय प्रतीक चिन्हांच्या अपमान केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. यामुळे आता एकता कपूर अडचणीत आली असून तिच्यासह अन्य तीन जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वेब सीरिजचे दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचा सुद्धा समावेश आहे.
अन्नपुर्णा पोलीस स्थानकाचे प्रभारी सतीश कुमार द्विवेदी यांनी शनिवारी असे म्हटले आहे की, एफआयआर दोन स्थानिक नागरिक वाशिंदो-वाल्मीकी आणि नीरज याग्निक यांनी तक्रार केल्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 294 (अश्लीलता) आणि 298 (धार्मिक भावना दुखावणे)सह सूचना प्रौद्योगिकी अधिनियम आणि भारताचे राजकीय प्रतीक अधिनियम अंतर्गत शुक्रवारी दाखल करण्यात आला आहे.(XXX Uncensored Season 2 Controversy: हिंदुस्तानी भाऊ ने एकता कपूर ला पद्मश्री पुरस्कार परत देण्याची केली मागणी, निर्माती ला म्हणाला - एक थी कबूतर, एकट्यातच ऐका हा व्हिडिओ Ear Phones Recommeded)
Madhya Pradesh: FIR registered against Producer Ekta Kapoor in Indore alleging insult to the national emblem, Hindu gods & Army personnel in Alt Balaji's XXX web series.
— ANI (@ANI) June 6, 2020
तक्रार दाखल करताना असे म्हटले आहे की, एकता कपूर हिच्या ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजीवर ट्रिपल एक्स (XXX) चा सीझन 2 च्या माध्यमातून समाजात अश्लीलता पसरवण्यात आली आहे. एका समुदाय खासकरुन त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. पोलीस स्थानकातील प्रभारी यांच्या मते तक्रारीत असा ही आरोप लावण्यात आला आहे की, या वेब सीरिज मधील दृश्यात भारतीय सेनेची वर्दी ही अत्यंत आपत्तिजनक प्रकारे दाखवत राष्ट्रीय प्रतीकांचा सुद्धा अपमान करण्यात आला आहे.(XXX Uncensored Season 2: हिंदुस्तानी भाऊ ने एकता कपूर वर 'हा' मोठा आरोप लावत खार पोलिसांकडे नोंदवली तक्रार Watch Video)
द्विवेदी यांनी असे म्हटले आहे की, तीन नामांकित आरोपींमध्ये एकता कपूर हिच्यासह वेब सीरिजचे निर्देशक पंखुडी रॉड्रिग्स आणि पटकथाकार जेसिका खुराना यांची सुद्धा नावे आहेत. या प्रकरणाची अधिक तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वेब सीरिजमधील वादग्रस्त मुद्दा पाहून पुढील पाऊल उलचण्यात येणार असल्याचे ही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.