फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर रिलेशनशिपमध्ये?
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Photo Credits: Instagram/Facebook)

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सध्या मॉडल शिबानी दांडेकरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. अधुना भबानीसोबत घटस्फोट झाल्यानंतर फरहान- श्रद्धा कपूरसोबतचे नाते चर्चेत होते. आता मात्र फरहान आणि शिबानीमधील जवळीक वाढू लागली आहे. फरहान अख्तरच्या एका पोस्टने  सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्या पोस्टमुळेच हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचा अंदाज लावला जात आहे.

फरहानने इंस्टाग्राम अकाऊंटवर शिबानीसोबतच्या फोटोसोबत एक हार्टची इमोजी शेअर केली आहे. या फोटोत फरहान-शिबानी हातात हात घालून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

हा फोटो पाहून फरहान शिबानीसोबतच्या आपल्या नात्याचा इशारा देत असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. काहीच महिन्यांपूर्वी शिबानीने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. पण दोघंही आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने कधी बोलणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.