Actor Vivek Passes Away: प्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेता विवेक यांचे निधन; बॉलिवूडमधील कलाकारांनी व्यक्त केला शोक
Actor Vivek (PC- Wikimedia Commons)

Actor Vivek Passes Away: तमिळ चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते विवेक (Vivek) यांचे चेन्नईच्या एसआयएमएस रुग्णालयात निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विवेकने आज पहाटे 4.35 वाजता शेवटचा श्वास घेतला.

विवेकच्या निधनानंतर चाहते तसेच सर्व कलाकार शोक व्यक्त करत आहेत. संगीतकार ए.आर. रहमान यांनी ट्वीट करून लिहिलं आहे की, "अभिनेता विवेक आम्हाला सोडून गेला, यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या आत्माला शांती लाभो. आपण अनेक दशके आमचे मनोरंजन केले. आपला वारसा नेहमी आमच्या पाठीशी राहिल." (वाचा - Manish Malhotra Tests Positive for COVID19: फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; स्वत:ला होम क्वारंटाईन करत सोशल मीडियावर दिली माहिती)

दिग्दर्शक मोहन राजा यांनी लिहिले की, 'विवेक सर, आश्चर्यचकित झालो आहे. दिग्गज अभिनेता आपल्यात नाही या बातमीवर विश्वास ठेवू शकत नाही. त्याच्याबरोबर काम केल्याच्या आठवणी माझ्यासोबत आहेत.'

संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी म्हटलं आहे की ‘हे देवा, मी ज्येष्ठ अभिनेते विवेक सरांविषयी ही धक्कादायक बातमी ऐकून उठलो. हृदय तुटले आहे. आमच्या काळातील महान विनोदकार ज्यांनी नेहमीच त्यांच्या विनोदातून एक सामाजिक संदेश दिला. मी नेहमीच तुमचा चाहता असेल. सर तुम्ही आमच्या अंत: करणात रहालं.'

अभिनेत्री राधिका सरतकुमार यांनी लिहिले की, 'विवेकबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीत. त्यांच्या अनेक आठवणी माझ्यासोबत आहेत. त्याच्या कुटुंबियांना धैर्य प्राप्त व्हावो.'