Fake Casting Alert: 'फिलहाल 2' गाण्याच्या कास्टिंगसाठी येणारे कॉल्स फेक; अक्षय कुमार याने ट्विट करत केला खुलासा
Fake Casting Alert by Akshay Kumar (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या 'फिलहाल' (Filhall) सॉन्गसाठी कास्टिंग सुरु असल्याचा कॉल प्रॉडक्शन कंपनीच्या नावाने केला जात आहे. दरम्यान हा कॉल फेक असल्याचे अक्षय कुमार याने ट्विट करत सांगितले आहे. त्याच्या नावाने फिरत असलेल्या या फेक न्यूज पासून सावध रहा, असे खुद्द अक्षयने सांगितले आहे. कारण 'फिलहाल 2' (Filhall 2) या गाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कॉस्टिंग अक्षय कुमार किंवा प्रॉडक्शन हाऊसद्वारे सुरु नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

अक्षयने यासाठी 'Filhall Part 2' या नावे नोटीस जारी केली आहे. याद्वारे त्याने त्याच्या सर्व फिलहालच्या चाहत्यांना सावध केले आहे. ही नोटीस शेअर करत त्याने लिहिले, "कोरोना व्हायरस संकटात फेक न्यूज खूप ऐकल्या आहेत. आता तर फेक कास्टिंग देखील होऊ लागले आहे." (बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ने सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला केली 45 लाख रुपयांची मदत)

Akshay Kumar Tweet:

काही अज्ञात लोक 'फिलहाल सॉन्ग पार्ट 2' साठी कास्टिंग सुरु असल्याची खोटी माहिती पसरवत आहेत. त्यामुळे मी आणि फिलहाल टीमची प्रॉडक्शन कंपनी याबद्दल स्पष्टीकरण देत आहोत. आम्ही अशा कोणत्याही प्रकारचे कास्टिंग करत नसून हे काम आम्ही दुसऱ्या कोणत्याही संस्थेला किंवा एजेंसीला देखील दिलेले नाही. तसंच 'फिलहाल 2' साठी नवीन कॉस्टिंग होणार नसून ओरिजनल कास्टसह हे गाणे प्रदर्शित केले जाईल. असे स्पष्टीकरण अक्षय कुमारने या नोटीसद्वारे दिले आहे.

तसंच फिलहाल गाण्याला मिळालेल्या प्रेमामुळे आम्ही लवकरच गाण्याचा दुसरा पार्ट 'फिलहाल 2' तुमच्या समोर सादर करण्यासाठी उत्सुक आहोत. परंतु, सध्याच्या कठीण काळात आपल्याला कायद्यांचेही पालन करायचे आहे. आम्ही लवकरच 'फिलहाल 2' घेऊन तुमच्या भेटीला येऊ, असे म्हणत त्याने चाहत्यांना आश्वस्त केले आहे. 'फिलहाल' सॉन्ग मध्ये अक्षय कुमार सह नुपुर सैनन झळकली होती. बी प्राक याने गायलेले हे गाणे इंटरनेटवर चांगलेच गाजले होते.