ईशा गुप्ता हिच्या Bikini Photo चा सोशल मीडियात धुमाकूळ; पहा व्हायरल फोटो
Esha Gupta (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियात चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ईशाने आपला हॉट बिकीनी फोटो (Bikini Photo) शेअर केला असून याने सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ईशाचा हा बिकीनी फोटो चांगलाच व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. ('या' कारणामुळे ईशा गुप्ताला नेटकऱ्यांनी केले ट्रोल)

हा फोटो शेअर करत ईशाने याला स्पॅनिश भाषेत कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ अनेक चाहत्यांना उमगला नाही. मात्र काहींनी या फोटोवर कमेंट करत ही स्पॅनिश भाषा असल्याचे सांगितले. तसंच ईशाने फोटोला दिलेल्या कॅप्शनचा अर्थ देखील सांगितला. "मी तुमचा विचार करत आहे,"असा या कॅप्शनचा अर्थ आहे. (ईशा गुप्ताचे इतर हॉट फोटोज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

ईशा गुप्ता हिचा हॉट फोटो:

 

View this post on Instagram

 

He estado pensando en usted

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

ईशा नेहमीच आपले हॉट, बोल्ड फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या फोटोची अनेकांना भूरळ पडत असून तिचा हा नवा फोटो देखील चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. ईशा गुप्ता हिने 'जन्नत 2' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. त्यानंतर ती 'राज 3 डी,' 'बेबी,' 'रुस्तम,' 'कमांडो 2,' 'बादशाहो,' 'पलटन,' 'टोटल धमाल' यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. ईशाचा 'मैं रहूं या ना रहूं' हा म्युझिक अल्बम चांगलाच लोकप्रिय झाला. बॉलिवूडसोबतच तिने तामिळ सिनेमांमध्येही काम केले आहे.