Emergency Film: अभिनेत्री Kangana Ranaut ने इमर्जन्सी चित्रपटासाठी आपली संपूर्ण मालमत्ता ठेवली गहाण, जाणून घ्या काय म्हणाली (Watch Video)
कंगना रनौत (Photo Credit : Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या ट्विटरवर तिच्या पुनरागमनामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे तिने तिच्या बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि ती लवकरच या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करणार आहे. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर कंगनाने संपूर्ण टीमसोबत रॅप-अप पार्टी साजरी केली. पार्टीमधून बाहेर पडल्यानंतर तिने माध्यमांशीही संवाद साधला. या संवादादरम्यान तिने सांगितले की, आपली सर्व मालमत्ता गहाण ठेवून तिने हा चित्रपट पूर्ण केला आहे.

'इमर्जन्सी' या चित्रपटाशी ती अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून जोडलेली आहे. कंगना राणौतने खुलासा केला आहे की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. यामुळे तिने आपली सर्व मालमत्ता गहाण ठेवली आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना कंगना राणौत म्हणाली की, हा चित्रपट बनवणे सोपे नव्हते. या चित्रपटासाठी तिने तिची प्रत्येक मालमत्ता गहाण ठेवल्याचे कंगनाने सांगितले. कंगना म्हणाली- 'मी ठरवलेले काम करत राहते. मालमत्ता गहाण ठेवणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. मी एका मिनिटात निर्णय घेते. पण शूटिंगच्या वेळी मला बँकांमध्ये धावपळ करावी लागली. आमचे शूटिंगही रखडले होते'. मात्र अखेर शुटींग पूर्ण झाले.’ (हेही वाचा: मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी पुन्हा दिसणार मोठ्या पडद्यावर; Sanjay Dutt आणि Arshad Warsi शेअर केले आगामी चित्रपटाचे पोस्टर)

कंगनाने पुढे सांगितले की, जेव्हा ती बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हते. आता 'इमर्जन्सी'मध्ये तिला सर्वस्व गमावावे लागले, तरी ती पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास तयार आहे. कंगना म्हणाली- 'मी 500 रुपये घेऊन या शहरात आले आणि जर मी पुन्हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तरी मी पुन्हा उभी राहू शकते, माझा स्वतःवर इतका विश्वास आहे'.