Sanjay Dutt New Film: मुन्ना भाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्ना भाई मध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) ची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आजही मुन्ना भाई आणि सर्किटची जोडी लोकांना पोट धरून हसवते. अर्शद आणि संजू बाबा यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा चाहत्यांकडून बऱ्याच दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपवत संजय दत्तने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये तो पुन्हा एकदा अर्शद वारसीसोबत दिसणार आहे.

संजय दत्तने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून, त्यात तो अर्शद वारसीसोबत कैद्यांच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. दोघेही तुरुंगात बंद आहेत आणि ते खूपच अस्वस्थ दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना संजय दत्त लिहिलं आहे की, 'आमची प्रतीक्षा तुमच्यापेक्षा जास्त होती, पण आता ही प्रतीक्षा संपली आहे. मी माझा भाऊ अर्शद वारसीसोबत आणखी एक मजेदार चित्रपट घेऊन परतलो आहे.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)