Dia Mirza On Environmental Change: वातावरणातील बदलाला उद्योग जबाबादार- दीया मिर्जा
Dia Mirza | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री दीया मिर्जा (Dia Mirza) पर्यावरणाच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक असते. 22 एप्रिल या दिवशी साजऱ्या होणाऱ्या पृथ्वी दिन 2021 (Earth Day 2021) निमित्त अभिनेत्री दीया मिर्जा हिने पुन्हा एकदा पर्यावरण बदलावरुन (Environmental Change) निशाणा साधला आहे. पर्यावरणातील बदलांना (Climate Change) देश आणि जगभरातील उद्योग आणि त्यांचे अधिकारी जबाबदार असल्याचे दीयाने म्हटले आहे. उद्योग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत असताना आपण व्यक्तिगत पातळीवर स्वत:लाही जबाबदार धरायला हवे असे दीया म्हणते. दीया सांगते की, आता आपल्याला आगोदरच्या तुलनेत अधिक गतीमान व्हायला हवे. पर्यावरण बदलाचा व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे या सर्व बदलांना सरकार, नागरिक, उद्योग आणि समाजालाही जबाबदार ठरवायला पाहिजे. विज्ञान आता काळासोबत बरेच बदलले आहे. त्याची आपण मदत घ्यायला पाहिजे असेही दीया सांगते.

दीया मिर्जा पुढे सांगते आम्हाला निसर्ग आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणसाठीही काम करावे लागेन. त्यासाठी कायदेशीर कारवाईची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी एक निश्चित धोरण ठरवून त्या दिशेने आपण काम करायला हवे. जेव्हा राजकीय, व्यापारी आणि पर्यावण क्षेत्रात काम करणारे नेते एकत्र येतील तेव्हाच आपण पर्यावरण संवर्धनासंदर्भात विषेष काही करु शकतो. जेणेकरुन एक नवी पृथ्वी अस्वित्वात येईल. (USUR)

कोरोना व्हायरस संकटाने स्पष्ट पणे सांगितले आहे की, आम्ही दैनंदिन जीवनात उत्पादन निर्मिती कितीही केली. ती कितीही आधुनिक असली तरी त्यात बदल करायला हवा. आज प्रत्येक व्यक्ती आरोग्याच्या समस्येने ग्रासला आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा निसर्गाशी प्रामाणिक राहात नाही तोवर गोष्टी मूळ पदावर येणार नाहीत, असेही दिया म्हणते. पर्यावरणीय बदालवर जोर देत दीया मिर्जा सांगते की, आम्हाला आज आवश्यकता आहे की, सर्व स्तरावर पर्यावरणाबाबत जागृत राहण्याची. पृथ्वी दिन एक निमित्त आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनातही पृथ्वी दिन साजरा करायला हवा.