दसऱ्याच्या निमित्त शाहरुख खान याने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी, लवकरच मुलगा अबराम सोबत चित्रपटातून झळकणार
Shahrukh and AbRam Khan (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड मधील किंग खान म्हणून ओखळला जाणारा शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर राहिला आहे. त्यामुळे शाहरुखचे चाहते तो पुन्हा कधी बॉलिवूड मध्ये एका धमाकेदार चित्रपटामध्ये पहायला मिळणार याची वाट पाहत आहेत. यावर शाहरुखने ट्वीटरवर #AskSRK असा टॅग वापरत चाहत्यांना त्याला प्रश्न विचारण्यास सांगितले आहे.

शाहरुख खान याचे चाहत्यांच्या प्रति प्रेम आणि आदर पुन्हा दिसून आला आहे. ट्वीटरवर आज एका युजर्सने शाहरुख याला प्रश्न विचारला की, तुझ्या आगामी चित्रपटात अबराम (AbRam Khan) याच्यासोबत कधी झळकणार? यावर शाहरुन याने मोठ्या कौतुकाने उत्तर दिले की, जेव्हा अबराम याच्याकडून मला जेव्हा काम करण्यासाठी तारिख दिली जाईल.(भूमी पेडणेकर ठरली 'Face Of Asia'; बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मिळाला सन्मान)

तसेच विविध प्रश्न शाहरुखला ट्वीटरवर विचारण्यात आले असून त्याची उत्तरे दिली जात आहेत. दुसऱ्या युजर्सने असे विचारले की, तुला कोणत्या पद्धतीचा सिनेमा काढायला आवडेल? त्यावर शाहरुख याने अगदी मोजक्याच शब्दात पण आनंद व्यक्त करत म्हटले की, हिट सिनेमा बनवायला मला फार आवडेल.

शाहरुख याने ट्वीटरवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांसोबत चाहत्यांना आजच्या दसऱ्याच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. तसेच शाहरुख याच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास त्याने कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या सोबत झळकला होता. मात्र सध्या शाहरुख रुपेरी पडद्यापासून थोडा दुर झाला असून त्याच्या कोणत्याही आगामी चित्रपटाची घोषणा त्याने केलेली नाही.