भूमी पेडणेकर ठरली 'Face Of Asia'; बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मिळाला सन्मान
Bhumi Pednekar. (Photo Credits: Instagram@Bhumi)

बॉलिवूडची अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिला नुकत्याच पार पडलेल्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (Busan Internataional Film Festival) मध्ये फेस ऑफ आशिया (Face OF Asia) हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यंदा या फेस्टव्हलचे 24 वे वर्ष होते. साऊथ कोरिया (South Korea) येथे पार पडलेल्या या फेस्टिव्हल मध्ये भूमी च्या 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर होते. भूमीने हा पुरस्कार मिळाल्यांनतर आपली इन्स्टाग्राम अकाउंट वरून याबाबत माहिती देत आपला सिनेमा बुसान मधील प्रेक्षक व समीक्षकांना आवडला ही अभिमानाची गोष्ट आहे तसेच हा एक भावनिक क्षण असल्याचे म्हंटले आहे.

भूमीने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मधून डॉली किट्टी सिनेमाच्या लेखिका अलंकृत श्रीवास्तव, निर्मात्या शोभा कपूर व एकता कपूर यांचे आभार मानले आहेत. तसेच हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय विजय असल्याचे आहे येत्या काळात आणखीन नवनवीन कामे करत राहीन तसेच प्रामाणिकपणे मेहनत घेऊन अशाच शानदार सिनेमाचा भाग बनत राहीन असे भूमीने म्हंटले आहे.

पहा भूमी पेडणेकर पोस्ट

दरम्यान, भूमीने आजवर बॉलिवूड मध्ये अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केले आहे. दम लगा के हैशा या सिनेमातून एक जाड महिलेची भूमिका साकारून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले,आणि त्यानंतर स्वतःला काहीच महिन्यात फॅट टू फिट ट्रान्सफॉर्म करून टॉयलेट सारख्या सिनेमांमध्ये ती सर्वांसमोर आली. अगं बाई! 'तिल गुड घ्या गोड गोड बोला' गुढी पाडव्याच्या शुभेच्छा; अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा नवा शोध

येत्या काळात 'सांड की आंख', 'बाला', 'पती पत्नी और वो', 'भूत- पार्ट वन: द हॉंटेड शिप' व 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या सिनेमातून भूमी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील सेंड की आणख सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असणं याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.