Don't Be Shy Song: टक्कल पडलेल्या माणसाला लाजू नका असा संदेश देणारे 'Bala' चित्रपटातील बादशहा च्या आवाजातील धमाकेदार गाणे प्रदर्शित
Don't Be Shy Song in Bala (Photo Credits: YouTube)

कमी वयात टक्कल पडलेल्या माणसाचे आयुष्यात होणारे बदल आणि घडणा-या घटना थोड्या वेगळ्या आणि हटके अंदाजात मांडणारा 'बाला' (Bala) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर आता या चित्रपटातील धमाकेदार गाणे 'डोन्ट बी शाय' (Don't be Shy)  प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. बॉलिवूडचा सध्याच्या घडीतला सुप्रसिद्ध रॅपर बादशाह च्या आवाजातील हे गाणे खूपच व्हायरल होत आहे. आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) , भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि यामी गौतमी (Yami Gautam) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

या रॅप साँगमध्ये आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर आणि यामी गौतमी या तिघेही बादशाह सोबत धमाल करताना दिसत आहे. 2010 साली आलेले 'कंगना तेरा नी' या गाण्याला बादशाह ने त्याचा बादशाही टच देऊन एका वेगळ्या रुपात आपल्यासमोर आणले आहे.

हेदेखील वाचा- 'बाला' या विनोदी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज; आयुष्मान साकारतोय ऐन तारुण्यात टकलेपण आलेल्या व्यक्तीचं पात्र

या चित्रपटात रंगभेदावरही भाष्य केलेले आहे. विषय जरी काहीसा अवघड वाटत असला, तरीही चित्रपटाची हाताळणी पूर्णपणे विनोदी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक याने केले आहे. तसेच आयुष्मान, भूमी आणि यामी सोबत जावेद जाफ्री, सीमा पहावा, सौरभ शुक्ला ही मंडळी सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.

आयुष्मान खुराना हे नेहमीच हटके आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट करतो. त्याचा विकी डोनर, अंधाधुन, ड्रीमगर्ल, दम लगा के हैशा, Article 15, बधाई हो, हे त्यातीलच काही महत्वाचे चित्रपट आहे. वेगळ्या पठडीचे चित्रपट निवडण्यात आयुष्मानचा हातखंडा राहिला आहे. त्यामुळे या ही चित्रपटात काही तरी वेगळं पाहायला मिळणार हे नक्की.