Dia Mirza | (Photo Credits-Facebook)

Asia Pacific 2000 विजेती आणि Miss India 2000 स्पर्धक अभिनेत्री दीया मिर्जा (Dia Mirza) हिने आपल्या त्या काळाबाबत भाष्य केले आहे. दीया मिर्जा म्हणते की, आज 20 वर्षांनंतर मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा हे सगळे अविश्वसनीय वाटते. खरे तर हे सगळे तेव्हा घडले जेव्हा मी खूपच लहाण होते. माझे वयही बरेच कमी होते. मिस इंडिया 2020 स्पर्धेबाबत आपला अनुभव सांगताना दीया बलत होती. 2000 हे वर्ष माझ्यासाठी नवी आशा, उत्साह आणि स्वप्न घेऊन आले, असेही दीयाने म्हटले आहे.

दीया मिर्जा हिने आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, हे सगळे घडण्यापूर्वी एका मॉडेलिंग एजंडने मला पाहिले होते. त्याने मी 16 वर्षांची असताना पार्ट टाईम जॉब ऑफर केला. त्यानंतर इतर गोष्टी खूपच वेगाने बदलत गेल्या. जाहीराती, कॅम्पेनिंग, फॅशन शो, एडिटोरीयल शूट अशा एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीचा दरवाजा उघडत गेला. मीस इंडिया स्पर्धेसाठी मी हैदराबाद येथून निवडली गेली. (हेही वाचा, कुटुंबियांना वेळ देता यावा म्हणून ‘एक्सप्रेशन क्वीन’ प्रिया वारियर ने डिअ‍ॅक्टीव्हेट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट)

दीया सांगते की, ती आयुष्यात पहिल्यांदाच हैदराबाद सोडून मुंबईला आली. मुंबईच्या वातावरणात तिने स्वत:ला जमवून घेतले. ती सांगते की, हा प्रवास तिच्यासाठी अत्यंत चांगला आणि उत्साह वाढवणारा होता. पण, या रस्त्यावरुन एकट्याने चालणे कठीण होते. एक व्यक्ती म्हणून तिने Miss India 2000 स्पर्धेकडे पाहिले नाही. तिने तिच्यातले सर्वश्रेष्ठ या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रवासात खूप गोष्टी आनंद देणाऱ्या घडल्या असेही दीने सांगितले.