कुटुंबियांना वेळ देता यावा म्हणून ‘एक्सप्रेशन क्वीन’ प्रिया वारियर ने डिअॅक्टीव्हेट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट
आपल्या नयनबाणांनी अनेकांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून नावारुपास आलेल्या प्रिया वारियर ने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट केलं आहे. इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियाने ट्रोलिंगकडे आणि नकारात्मक चर्चा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही दिवसातचं तिने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट केलं आहे.
आपल्या नयनबाणांनी अनेकांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरियर (Priya Prakash Varrier) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘एक्सप्रेशन क्वीन’ (Expression Queen) म्हणून नावारुपास आलेल्या प्रिया वारियर ने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट (Deactivates Instagram Account) केलं आहे. इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियाने ट्रोलिंगकडे आणि नकारात्मक चर्चा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही दिवसातचं तिने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट केलं आहे.
प्रिया आपल्या कुटुंबियांना वेळ देता यावा यासाठी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने हा सर्व वेळ तिला आपल्या कुटुंबियांसोबत घालवायचा आहे. कुटुंबियांना वेळ देता यावा म्हणून तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता शिंदे च्या बोल्ड फोटोजची सोशल मीडियावर चर्चा; पहा हॉट फोटोज)
दरम्यान, प्रियाचे इन्स्टाग्रामवर जवळपास 7 मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. प्रिया नॅशनल क्रश आहे. त्यामुळे प्रियाचे सोशल मीडियावर तुफान चाहते आहेत. प्रियाने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्यापूर्वी मल्याळम भाषेत एक व्हिडीओ शेअर केला होता. प्रिया वारियर मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील एका व्हिडीओमुळे रातोरात प्रसिद्ध झाली होती. 26 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये प्रिया प्रकाशचे एक्सप्रेशन्सने सर्वांवर जादू केली होती. प्रिया ही एक उत्तम मल्याळम अॅक्ट्रेस आणि मॉडल आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2020 03:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

