Dia Mirza ने दिला गोंडस मुलाला जन्म, दोन महीने आधीच झाली आई
Dia Mirza ( Photo Credit - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा तिच्या गर्भावस्थेविषयी बराच काळ चर्चेत राहिली होती. अखेर दियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.दिया नेहमीच तिच्या सोशल मिडीयावर एक्टिव्ह असते.दिया दोन महीने आधीच आई झाली आहे अशी माहिती तिने स्वतःहा सोशल मिडीयावर दिली आहे.दिया ने तिच्या सोशल मिडीयावर याबद्दल माहिती देत लिहीले आहे की 14 मे रोजी तिने एका मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव अव्यान आझाद आहे'.  (Dia Mirza Honeymoon Pic: अभिनेत्री दीया मिर्झा हिच्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल )

आपल्या इन्स्टाग्रामवर मुलाची झलक पोस्ट करत लेखिका एलिझाबेथ स्टोनच्या (Elizabeth Stone) यांच्या काही ओळी ही तिने लिहिल्या आहेत. ज्यात तिने लिहिले आहे की,''मूल होण्यासाठी आपल्याला नेहमीच असे निर्णय घ्यावे लागतात की आपले हृदय नेहमी आपल्या शरीराच्या आसपास असेल'.हे शब्द या वेळी वैभव आणि माझ्या भावनांचे परिपूर्ण उदाहरण आहेत.आमच्या हृदयाचा ठोका अव्यान आजाद रेखी (AVYAAN AZAAD REKHI) चा जन्म 14 मे ला झाला होता.वेळेच्या आधी झाल्यानंतर आईसीयूमधील सर्व नर्स आणि डॉक्टरांनी त्याची काळजी घेतली.माझ्या गरोदरपणात मला अचानक ऑपरेशन करावे लागले ज्यामुळे मला जीवघेणा 'सेप्सिस' या गंभीर संसर्गाचा धोका वाढला.''

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

 

अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे आणि हे तिचे पहिले बाळ आहे. यापूर्वी दीया मिर्झाचे 2014 मध्ये साहिल संघाशी लग्न झाले होते. 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला  त्यानंतर दीया मिर्झाने 2021 मध्ये वैभव रेखाशी लग्न केले. वैभव रेखाला आधीच एक मुलगी आहे