Padma Awards: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनेता मनोज बाजपेयी ह्याचा 'पद्म श्री' पुरस्काराने गौरव
अभिनेता मनोज बाजपेयी (Photo Credits-ANI)

बॉलिवूड सुप्रसिद्ध कलाकार मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) ह्याला शनिवारी (16 मार्च) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)  यांच्या हस्ते 'पद्म श्री' (Padma Shri Award) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बॉलिवूड मध्ये गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या मनोज बाजपेयीसाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि यशाची पायरी आहे. आपली दमदार भुमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मनोजने आज प्रेक्षकांना आणि घरातील मंडळींचा आनंद द्विगुणित केला आहे.

सोशल मीडियावर पद्म श्री पुरस्कार 2019 चे फोटो झळकले आहेत. त्यामध्ये रामनाथ कोविंद मनोज बाजपेयी ह्याचा सन्मान करताना दिसून आले आहे.(हेही वाचा-Padma Awards 2019: सिनेसृष्टीतील शंकर महादेवन, प्रभुदेवा यांच्यासह दिग्गज कलाकार पद्म पुरस्काराने सन्मानित)

ANI ट्वीट:

मनोज याच्यासह भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू गौतम गंभीर ह्याला सुद्धा पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पद्म श्री पुरस्कार हा भारत सरकारच्या तर्फे देण्यात येणारा एक महत्वपूर्ण सन्मान म्हणून मानला जातो. भारताच्या नागरिकत्वाच्या पदानुक्रमातील हा चौथा पुरस्कार आहे. तर भारत रत्न,पद्म विभूषण आणि पद्म भूषण हे पुरस्कार ही देण्यात येतात.