Padma Awards 2019: सिनेसृष्टीतील शंकर महादेवन, प्रभुदेवा यांच्यासह दिग्गज कलाकार पद्म पुरस्काराने सन्मानित
अभिनेता-कोरिओग्राफर प्रभुदेवा आणि सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारताना | (Photo Credits: Twitter)

Padma Awards 2019: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind)यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्काराने दिग्गजांना सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि अभिनेता -कोरिओग्राफर प्रभुदेवा (Prabhudeva) यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. यात दक्षिण भारतातील प्रसिद्ध ड्रमर शिवमणि (Sivamani), यांनाही पद्मश्री पुरस्कार Padma Shri award) देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर, दक्षिण भारतातील आणखी एक सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांच्यासह सुमारे 56 दिग्गज पद्म भूषण (Padma Bhushan)पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

राष्ट्रपती भवनात रंगलेल्या या सोहळ्यात फ्रीस्टाइल रेसलिंग (कुस्ती) मल्ल बजरंग पुनिया (Bajrang Punia), टेबल टेनिस स्टार शरत कमल (Sharath Kamal), भारतीय बुद्धीबळ ग्रैंडमास्टर हरिका द्रोनावल्ली (Harika Dronavalli) आणि कबड्डीपटू अजय ठाकुर (Ajay Thakur) यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (हेही वाचा, Padma Awards 2019: फ्रीस्टाइल रेसलर बजरंग पुनिया, टेबल टेनिस स्टार शरत कमल पद्म श्री पुरस्काराने सन्मानित)

भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नागरी पुरस्कारांच्या क्रमवारीनुसार पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. त्याआधी भारत रत्न, पत्न विभूषण, आणि पद्म भूषण पुरस्काराचे स्थान असते. देवनागरी लिपीत या पुरस्काराचा उल्लेख करताना या पुरस्कारापुर्वी 'श्री' असे लिहिण्याची किंवा जोडण्याची पद्धत आहे. जसे की, पद्मश्री.