Deepika Ranveer Wedding Reception: दीपिका -रणवीर सिंग ने शेअर केला बेंगळुरूतील रिसेप्शन पार्टीचा पहिला फोटो
deepika Ranveer wedding reception

Deepika Ranveer Bangalore reception:  दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh)  ही बॉलिवूडमधील रॉयल कपल काही दिवसांपूर्वी इटलीमध्ये विवाहबंधनात अडकली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला विवाहसोहळा फारच खाजगी ठेवण्यात आला होता. मात्र आज दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचं पाहिलं रिसेप्शन बेंगळुरू मध्ये आयोजित करण्यात आलं आहे. दीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटो अल्बम नंतर आज पहिल्या वाहिल्या रिसेप्शनचा फोटो दीप वीरच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

दीपिका पदुकोणच्या कुटूंबाकडून आज बंगळुरूच्या द लीला पॅलेस हॉटेलमध्ये पाहिलं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे. रिसेप्शन सोहळा सुरु होण्यापूर्वीच दीपिका रणवीरने त्यांचा पहिला फोटो शेअर केला आहे. यामध्ये दीपिकाने ऑफ व्हाईट आणि सोनेरी नक्षीकाम असलेली पारंपारिक दक्षिण भारतीय पद्धतीची साडी नेसली आहे तर रणवीर सिंगनेही नक्षीकाम केलेला सलवार कुडता परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

बेंगळुरूमधील रिसेप्शन पार्टीनंतर रणवीर आणि दीपिकाने बॉलिवूड कलाकार आणि मित्र मंडळींसाठी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवले आहे.