Instagram वर शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला Deepika Padukone चे सडेतोड उत्तर
Deepika Padukone (Photo Credits: Facebook/fanclub)

Deepika Padukone Shuts Troll: बॉलिवूड कलाकार आणि इतर सेलिब्रिटी यांना सोशल मीडियावर वारंवार ट्रोल केले जाते. काही कमेंट्स तर अत्यंत वाईट असतात. सेलिब्रिटी अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र काही वेळेस याचे चोख उत्तर देणे गरजेचे असते. तर  परंतु, यामुळे कलाकार मात्र त्रस्त होतात. अशाच एक किस्सा अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत घडला. फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामवर दीपिकाला एक युजरने चक्क शिवी दिली. मात्र यावर दीपिकानेही सडेतोड उत्तर दिले आहे. (Deepika Padukone Blasts at Paparazzi: गाडीचा पाठलाग करणाऱ्या पॅपराझी वर भडकली दीपिका पदुकोण; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा)

दीपिका पदुकोण ने सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. दीपिका ने सोशल मीडियावर या व्यक्तीच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. त्याला लाल रंगाने हायलाईट करण्यात आले आहे. या व्यक्तीला उत्तर देताना दीपिका म्हणते की, "वा! तुझ्या कुटुंबिय आणि मित्रमंडळींना तुझ्यावर किती गर्व असेल ना."

दीपिका पदुकोण ने शेअर केलेला स्क्रिनशॉर्ट (Photo Credits: Instagram)

यावर्षी दीपिका कामांमध्ये व्यग्र असणार आहे. लवकरच ती सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे सह 'शकुन बत्रा' या सिनेमात झळकणार आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्या 'अनटाइटल्ड' सिनेमातही ती काम करणार आहे.

दरम्यान, रणवीर सिंह सोबतचा '83' सिनेमा देखील यंदा रिलीज होणार आहे. याशिवाय ऋतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमात ती दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन  सिद्धार्थ आनंद करत आहेत. तसंच शाहरुख खानच्या 'पठान' सिनेमातही तिची मुख्य भूमिका असणार आहे.