Chhapaak: दीपिका पादुकोण आणि निर्मात्यांविरूद्ध कॉपीराइट उल्लंघनाची तक्रार दाखल
Deepika Padukone Look In Chhapaak Film (Photo Credits: Instagram)

Copyright violation complaint against Chhapaak: एका चित्रपट निर्मात्याने अभिनेत्री दीपिका पादुकोण, दिग्दर्शक मेघना गुलजार आणि 'छपाक' च्या निर्मात्यांविरूद्ध मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयात कॉपीराइट उल्लंघनाची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार राकेश भारती यांनी दावा केला आहे की, 'छपाक' ही कथा त्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टवर आधारित आहे. दाखल केलेल्या तक्रारीत निर्मात्याने असे सांगितले आहे की त्याने आपल्या मुलासह, अ‍ॅसिड हल्ल्यापासून बचावलेल्यांच्या कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्लॅन केला होता. या दोघांनी मे 2015 मध्ये ‘ब्लॅक डे’ या शीर्षकाखाली या चित्रपटाचे नावदेखील नोंदवले होते.

तक्रारदाराने असेही सांगितले की त्याने या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन, कंगना रनौत या अभिनेत्रींना तसेच फॉक्स स्टार स्टुडिओसारख्या प्रोडक्शन हाऊसना भेट दिली होती.

याशिवाय राकेश यांनी असा आरोप केला की या प्रस्तावासाठी त्यांनी स्क्रिप्टची एक प्रत फॉक्स स्टार स्टूडियो, केए प्रोडक्शन आणि मृगा फिल्म्सच्या ऑफिसमध्येही दिली होती कारण या निर्मात्यांनी चित्रपट बनवण्यास रस दाखविला होता. परंतु, नंतर त्याला समजले की हे चित्रपट निर्माते त्याच विषयावर स्वतंत्र चित्रपट बनवित आहेत.

या निर्मात्यांनी त्याच्या पटकथेमध्ये वरवरचे बदल केले आणि 'छपाक' हा चित्रपट सादर केला, याची पुष्टी त्याने केली. फॉक्स स्टार स्टुडिओ, मृगा प्रॉडक्शन आणि दीपिकाचे केए प्रॉडक्शन हे चित्रपटाची सह-निर्मिती करत आहेत.

छपाक सिनेमातील लक्ष्मीचा लूक साकारण्यासाठी 'दीपिका पदुकोण' ला लागले तब्बल इतके तास

दरम्यान, अ‍ॅसिड हल्ल्यापासून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आणि अनुभवांवर आधारित छपाक हा चित्रपट आधारित आहे. दीपिका अ‍ॅसिड हल्ला झालेल्या एका तरुणीची भूमिका करताना दिसत आहे. ही तरुणी केवळ तिच्या हल्लेखोरांविरूद्ध लढत नाही तर इतर अ‍ॅसिड हल्ल्यातील अपहरण झालेल्यांचा आवाज बनते. येत्या 10 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प सिनेमा प्रदर्शित होणार आहे.