Deepika Padukone Look In Chhapaak Film (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने 'छपाक' (Chhapaak) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या सिनेमात दीपिका अॅसिड पीडित तरुणी लक्ष्मी अग्रवाल (Laxmi Agarwal) हिची आगळीवेगळी भूमिका साकारत आहे. या सिनेमातील दीपिकाचा लूक पाहून कोणीही तिला ओळखले देखील नाही. ही किमया साधली ती अप्रतिम मेकअपने.

हा मेकअप करण्यासाठी दीपिकाला किती तास लागले याची तुम्हाला कल्पना आहे का? न्युज 18 च्या रिपोर्टनुसार, लक्ष्मीचा लूक साकारण्यासाठी दीपिकला चार तास लागले. तसंच मेकअप उतरवण्यासाठी देखील खूप वेळ लागतो. त्याचबरोबर दररोज शूटिंग दरम्यान सारखाच मेकअप होणे, हे देखील एक आव्हान आहे. मात्र कसबी मेकअप आर्टिस्ट ही किमया अतिशय लिलया साधत आहेत.

छपाक मधील दीपिकाची पहिली झलक:

काही दिवसांपूर्वी छपाक सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लूक समोर आला. त्यानंतर दीपिकाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला. त्यात दीपिका लक्ष्मीच्या लूकमध्ये पिवळ्या रंगाचा सूट घातलेली दिसत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या या दीपिकाला ओळखणेही कठीण झाले. ('छपाक' मधील भुमिकेच्या रुपात एकटीच रस्त्यावर उभी दिसली दीपिका पादुकोण, लोकांनी ओळखलेच नाही)

पहा व्हिडिओ:

या सिनेमात विक्रांत मेसी दीपिकाच्या (लक्ष्मीच्या) बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल.