'छपाक' मधील भुमिकेच्या रुपात एकटीच रस्त्यावर उभी दिसली दीपिका पादुकोण, लोकांनी ओळखलेच नाही
दीपिका पादुकोण (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही सध्या तिचा आगामी सिनेमा छपाक (Chhapaak) मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या छपाक चित्रपटाच्या शूटींगमध्ये दीपिका सध्या व्यस्त आले. तर शूटिंगदरम्यान चित्रपटातील एक दृष्य समोर आले असून, त्यामध्ये दीपिका छपाक मधील भुमिका साकारताना दिसून आली आहे. तसेच रस्त्यावर एकटी उभ्या असेल्या दीपिकाला तिच्या या रुपामुळे लोकांनी ओळखलेच नाही.

काही दिवसांपूर्वी छपाक चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून त्याचे शूटिंगसुद्धा सुरु झाले आहे. छपाक चित्रपटाची कथा अॅसिड हल्ला करण्यात आलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे. तर दीपिका ही छपाक मधून मालती नावाच्या मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. याचदरम्यान शूटिंगवेळी अॅसिड हल्ला झालेल्या रुपात रस्त्यावर दिसली. मात्र रस्त्यावरील लोकांनी ती दीपिका पादुकोण असल्याचे ओळखलेच नाही.(हेही वाचा-Chhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक! (Photo)

या चित्रपटामधून दीपिका हिच्यासह विक्रांत मेसी सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. जो मालती हिच्या प्रियकराची भुमिका पार पाडणार आहे. यापूर्वी विक्रांत हा लुटेरा, अ डेथ इन द गंज यामधून झळकला होता. तर 10 जानेवारी 2020 रोजी छपाक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.