दीपिका पादुकोण (Photo Credits-Instagram)

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिच्या अभिनयामुळे सर्वांची ती मनं जिंकतेच. पण तिचा फॅशन सेंन्स सुद्धा नेहमीच चर्चेत असतो. तिची स्टाइल निराळी असतेच पण ती सर्वांच्या पसंदीस ही पडते. अशातच दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियात खुप ट्रेन्ड होत आहेत. त्यामागे काही खास कारण सुद्धा आहे. अभिनेत्रीने काळ्या रंगाचे आउटफिट्स घातल्याचे दिसून येत आहे. हेच आउटफिट तिच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.(Anushka Sharma चा आई झाल्यानंतरचा लूक पाहून सर्वांना बसेल आश्चर्याचा धक्का, See Pic)

दीपिका पादुकोण हिच्या आउटफिट्ससह एक काळ्या रंगाचा मास्क घातला आहे. हा मास्क अत्यंत साधा जरी दिसत असला तरीही तो ट्रेन्ड होत आहे. याची किंमत तुम्ही ऐकाल तर हैराण व्हाल. कारण दीपिकाचा हा काळ्या रंगाचा मास्क बाजारात 25 हजार रुपयांना आहे. त्यामुळे दीपिकाचे फक्त मास्कसाठीच फक्त 25 हजार रुपये खर्च केले आहेत. मास्क सोबत दीपिकाची हँडबॅगची किंमत सुद्धा 2 लाखांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.(Jacqueline Fernandez ने इंस्टाग्रामवर शेअर केले Aerial Yoga करतानाचे खास फोटो; See Photos)

दीपिका हिच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती 83 आणि शकुन बत्रा याचा अनटाइटल्ड चित्रपटात झळकणार आहे.  त्याचसोबत 300 कोटी रुपयांचा बिग बजेट असलेला सिनेमा रामायण यात सुद्धा ती भुमिकेत दिसू शकते अशी चर्चा सुरु आहे.