Jacqueline Fernandez ने इंस्टाग्रामवर शेअर केले Aerial Yoga करतानाचे खास फोटो; See Photos
Jacqueline Fernandez Aerial Yoga Photo (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज (Jacqueline Fernandez) ने स्वत: चा एक इंटरेस्टिंग फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती योगा करताना दिसून येत आहे. जॅकलिन फर्नांडिज फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जॅकलिन फर्नांडिज आपल्या चाहत्यांसाठी स्वत: चे खास फोटो शेअर करत असते. जॅकलिनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती एरियल योगा करताना दिसत आहे. जॅकलिन फर्नांडिजने हा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, 'हाय अप साइड डाउन'. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जॅकलिन फर्नांडिजचा हा फोटो चाहत्यांना खूपचं आवडता आहे. फोटोमध्ये जॅकलिन फर्नांडिज एरियल योगा करताना दिसली आहे. तिने पांढऱ्या रंगाचे बॅलेट आउटफिट परिधान केले आहे. तसेच तिने व्हाइट कलरचे स्टॉकिंग्ज घातले आहे. याशिवाय तिने लाइट मेकअप केला आहे आणि कॅमेर्‍यासाठी पोज दिली आहे. (वाचा - Aamir Khan च्या फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात पडली मुलगी Ira Khan; Valentines Day अगोदर शेअर केले रोमँटिक फोटोज)

या फोटोत जॅकलिन फर्नांडिज खूपचं सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स दिल्या आहेत. यात काही कलाकारांचाही समावेश आहे. जॅकलिनला मनीष मल्होत्राने शुभेच्छा दिल्या आहेत. जॅकलिन फर्नांडिजने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय ती आगामी चित्रपच 'बच्चन पांडे'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कृती सॅनन यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन आणि अरशद वारसी आणि इतरांनी जैसलमेरमध्ये फरहाद समजी दिग्दर्शित बच्चन पांडे चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या टीमचे गेल्या एक महिन्यापासून जैसलमेरमध्ये शूटिंग सुरू असून चित्रपटासाठी काही अ‍ॅक्शन सीन्सही शूट करण्यात आले आहेत. या चित्रपटासाठी जॅकलिन फर्नांडिस पुढच्या आठवड्यापासून शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे वृत्त आहे.