आमिर खान (Aamir Khan) ची मुलगी इरा खान (Ira Khan) ने फिटनेस प्रशिक्षक नुपूर शिखरे यांच्याशी असलेल्या संबंधाची पुष्टी दिली आहे. इराने व्हॅलेंटाईन डे आणि प्रॉमिस डे च्या निमित्ताने सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करणारी खास पोस्ट शेअर करून नूपूरसोबतच्या तिच्या नात्याची पुष्टी केली आहे. इराने नुपूरबरोबरचे आपले अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो कँडिड अंदाजात दिसत आहे. नुपूरसोबतचे फोटो शेअर करताना इराने लिहिलं आहे की, "तुझ्याबरोबर राहणे आणि तुला वचन देणे ही सन्मानाची बाब आहे." फोटोंमध्ये नूपूरचे प्रेम इराच्या डोळ्यांमधून स्पष्ट दिसत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर दंगल अभिनेत्री फातिमा सना शेख ने खास हार्ट एमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. त्याचवेळी इराचा मित्र अभिनेता गुलशन देवय्या यांनीही इमोजी शेअर करुन तिचे अभिनंदन केले आहे. (वाचा - 1962 The War In The Hills वेब सिरिजमधून महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर करणार डिजिटल डेब्यू)
इतकेचं नाही तर इराच्या सर्व चाहत्यांनी सोशल मीडियावर या पोस्टवर भाष्य करताना तिचे अभिनंदन केले आहे. इराने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नुपूरचा टॅटू डिझाइन केला होता, जो तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओद्वारे शेअर केला होता.
View this post on Instagram
वडिलांप्रमाणेचं इराला अभिनयात रस नाही. इराने Euripedes’ Medea (2019) या नाटकातून दिग्दर्शनास सुरुवात केली. या नाटकात हेजल कीच मुख्य भूमिकेत होती, तर इराचा भाऊ जुनैद खाननेही या नाटकात काम केलं होतं.