Anushka Sharma चा आई झाल्यानंतरचा लूक पाहून सर्वांना बसेल आश्चर्याचा धक्का, See Pic

अनुष्काने तिचा एक सेल्फी (Anushka Sharma Selfi) इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात तिचा लूक पाहून सर्वजण अवाक् होतील.

Anushka Sharma चा आई झाल्यानंतरचा लूक पाहून सर्वांना बसेल आश्चर्याचा धक्का, See Pic
Anushka Sharma Selfi (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 11 जानेवारी 2021 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराट कोहली (Virat Kohli) या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यानंतर अनेक जण तिच्या मुलीची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. इतकंच काय फिटनेस फ्रिक असलेली अनुष्का शर्मा बाळंतपणात कशी दिसते, प्रसतीनंतर तिच्यात काय बदल झाले हे पाहण्यासाठी देखील तिचे चाहते आतुर होते. नुकताच अनुष्काने तिचा एक सेल्फी (Anushka Sharma Selfi) इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात तिचा लूक पाहून सर्वजण अवाक् होतील.

या फोटोमध्ये गरोदरपणापूर्वीची अनुष्का जशी होती अगदी तशीच्या तशीच बारीक दिसत आहे. थोडक्यात एका बाळाची आई झाल्यानंतरही अनुष्काच्या फिगरमध्ये यत्किंचितही बदल झाला नाही हे तुम्हाला ही सेल्फी पाहिल्यानंतर लक्षात येईल.हेदेखील वाचा- विराट कोहली, अनुष्का शर्मा च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

सध्या अनुष्काने आपले आईपण छान एन्जॉय करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी विराट-अनुष्काने आपल्या मुलीला हातात घेतल्याचा फोटो शेअर केला होता. मात्र यात तिचा चेहरा दिसला नाही. आता अनुष्का-विराटच्या मुलीची पहिली झलक कधी पाहायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

अनुष्का सध्या मॅटर्निटी लिव्ह वर आहे. मे 2021 पर्यंत अनुष्का पुन्हा कामााला सुरूवात करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान विरूष्काच्या आयुष्यात 11 तारीख ही खास ठरली आहे. 11 डिसेंबर 2017 ला ते दोघे विवाहबद्ध झाले होते. आणि आता त्यांच्या मुलीचा जन्म 11 जानेवारी 2021 ला झाला आहे. विराट देखील सध्या ब्रेकवर आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये क्रिकेट संघाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2021 03:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).