दीपिका पादुकोण चा हा 'मिशी' मधला फोटो पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर
Deepika Padukone (Photo Credits: File)

आपल्या दमदार अभिनयाने आणि ग्लॅमरस लूक ने सर्वांना घायाळ करणारी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोशल मिडियावर बरीच सक्रिय दिसते. कधी ती आपले बोल्ड फोटो टाकून तर आपल्या पती रणवीर सिंहसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करुन चाहत्यांशी संवाद साधते. नववर्षाच्या निमित्ताने नुकताच तिने आपल्या सोशल अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. आपल्या लहानपणीचा एक मजेशीर फोटो शेअर करत तिने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि निरागस दिसत आहे. यात तिने पांढ-या रंगाचा सदरा-लेहंगा परिधान केला असून अंगावर शाल घेतली आहे आणि मुख्य म्हणजे यात तिला मिशा काढलेल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

May you always have clarity of thought & action...Happy #2020!🎉

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

हेदेखील वाचा- Chhapaak Official Trailer: दीपिका पादुकोण च्या दमदार अभिनयाचा 'छपाक' चा ट्रेलर आऊट; अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जिद्दीची उलगडणार प्रेरणादायी कहाणी

हा फोटो पाहून तुम्ही खळखळून हसला असला मात्र लहानपणापासून दीपिकाला अभिनयाची, वेशभूषा करण्याची आवड होती हे यावरुन दिसून येतय.

दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी चित्रपट 'छपाक' च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात ती अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवाल ची भूमिका साकारणार आहे. अॅसिड हल्ला तरुणी लक्ष्मी अग्रवाल हिच्या सोबत झाली ती दुर्दैवी घटना आणि त्या घटनेनंतर तिने सुरु केलेला लढा या ट्रेलरमधून दाखविण्यात आला आहे. येत्या 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.