Chhapaak Trailer (Photo Credits: YouTube)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिची प्रमुख भूमिका असलेला छपाक (Chhapaak) चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रदर्शित झाला. अॅसिड हल्ला तरुणी लक्ष्मी अग्रवाल हिच्या सोबत झाली ती दुर्दैवी घटना आणि त्या घटनेनंतर तिने सुरु केलेला लढा या ट्रेलरमधून दाखविण्यात आला आहे. अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यांच्या कडा ओलावणारा या ट्रेलरमध्ये दीपिकाच्या दमदार अभिनयाची झलकही पाहायला मिळेल. मेघना गुलझार (Meghna Gulzar) दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलर ने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

अॅसिड हल्ला पीडित तरुणीची भूमिका साकारताना दीपिकाने अभिनयापासून त्या मेकअपसाठी घेतलेली मेहनत तुम्हाला या ट्रेलरमधून दिसेल.

पाहा छपाक चा ट्रेलर:

हेदेखील वाचा- दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांचा 'छपाक' सिनेमातील Kissing Scene लीक (Viral Video)

या सिनेमात विक्रांत मेसी दीपिकाच्या (लक्ष्मीच्या) बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल.

न्युज 18 च्या रिपोर्टनुसार, लक्ष्मीचा लूक साकारण्यासाठी दीपिकला चार तास लागले. तसंच मेकअप उतरवण्यासाठी देखील खूप वेळ लागायचा. त्याचबरोबर दररोज शूटिंग दरम्यान सारखाच मेकअप होणे, हे देखील एक आव्हान होते. मात्र कसबी मेकअप आर्टिस्ट ही किमया अतिशय लिलया साधली.