Sara & Varun (Photo Credit-Instagram)

Coolie No 1 Remake: सैफ अली खानची (Saif Ali Khan) लेक सारा अली खानचं 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं,त्यानंतर रोहितच्या 'सिंबा' सिनेमातून ब्लॉकबस्टर सिनेमा दिला आता सारा अली खान लवकरच 'कुली नंबर 1' (Coolie No 1) सिनेमाच्या सिक्वेलमध्ये वरूण धवनसोबत (Varun Dhawan) झळकणार आहे.

डेविड धवन आणि वशू भगनानी 25 वर्षांनंतर कुली नंबर 1 सिनेमाचा रिमेक बनवणार आहेत. या सिनेमात वरूण धवन आणि सारा अली खान ही जोडी झळकणार आहे. तर ऑगस्ट 2019 पासून या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

1995 साली आली कुली नंबर 1 सिनेमामध्ये गोविंदा आणि करिष्मा कपूर ही जोडी झळकली होती. वरूण धवनचे वडील आणि प्रसिद्ध सिनेनिर्माते डेविड धवन यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. यापूर्वी वरूण आणि डेविड धवन या बाप -बेटाच्या जोडीने जुडवा 2 हा सिनेमा एकत्र केला होता.