बॉलिवूड मधील सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दबंग 3' चा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. तर ट्रेलर लॉन्च केल्याच्या अवघ्या काही वेळातच 4 लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी त्याला पसंदी दिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर एकदम धमाकेदार असून सुरुवातीलाच चुलबूल इज बॅक म्हणत सलमान खान याची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. एवढेच नाही ट्रेलरमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबतचे नाते आणि त्यांच्या दोघांमधील मजेशीर किस्से यांची झलक सुद्धा ट्रेलरमधून दाखवण्यात आले आहे. मात्र बहुतांश ट्रेलरमध्ये अॅक्शन सिनसह थ्रिलर दाखण्यात आले आहे.
सलमान खान याच्या दबंग 3 मधून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर डेब्यु करणार आहे. ट्रेलरमधील काही दृष्यांमधून सई सोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे. त्याचसोबत सलमान दोन विविध अवतारात सुद्धा झळकणार आहे. दबंगच्या भुमिकेतील सलमान खान यापूर्वीच्या दबंग चित्रपटाच्या सिक्वल सारखीच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा ठरणार आहे.(Dabangg 3 Saiee Manjrekar First Look: दबंग 3 मधून डेब्यू करत आहे महेश मांजरेकर यांची मुलगी; सलमान खानने शेअर केला फर्स्ट लुक)
Dabangg 3 Official Trailer Watch Here:
दबंग 3 चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवा यांनी केले असून त्याचे निर्मिती सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदी यांनी केले आहे. या चित्रपटातून सलमान खान याच्यासह सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर मुख्य भुमिकेतून दिसणार आहे. तर मंगळवारी सई हिने तिच्या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरुन तिचा दबंग 3 मधील लूक झळवकला असून ती सलमान खान याच्या प्रेयसीची भुमिका साकारणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला दबंग 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.