Cruise ship party case (Photo Credits-ANI)

Cruise Ship Raid Case: क्रुज पार्टी ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने (NCB) साक्षीदार किरण गोसाई (Kiran Gosai) याच्या विरोधात 2018 मधील एका फसवणूकी प्रकरणी पुणे पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली आहे. लुकआउट नोटीस नुसार, त्याला आता देश सोडून जाता येणार नाही आहे. पुण्यातील पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी असे म्हटले की, आम्ही केपी गोसाई याच्या विरोधा लूकआउट नोटीस जाही केली आहे. ती फर्शखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये फसवणूकी प्रकरणा संबंधित आहे.

केपी गोसाई हा तोच व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खाच्या अटकेनंतर सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता. यावर स्पष्टीकरण देत एनसीबीने म्हटले की, तो आमच्या विभागाच्या अधिकारी नाही आहे. केपी गोसाई याच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सुद्धा एनसीबीवर काही आरोप लावले होते.(Aryan Khan Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवून महिलेने क्रुजवर ड्रग्ज नेल्याचा NCB कडून मोठा खुलासा)

Tweet:

क्रुजवर मिळालेल्या अंमली पदार्थ्यांच्या जप्ती प्रकरणी गोसाई हा स्वतंत्र साक्षीदारांमधील एक आहे. या प्रकरणी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या नुसार, गोसाईच्या विरोधात मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे सांगत एका व्यक्तीला लूटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.