Cruise ship party case (Photo Credits-ANI)

Cruise Ship Party Case: एनसीबीला क्रुज शिप पार्टीमध्ये ड्रग्ज मिळाल्याप्रकरणी सोमवारी सकाळी ते जहाज मुंबईत परतल्यानंतर त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. तेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, सोमवारी झालेल्या या तपासणीत क्रुजवरुन मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.(Aryan Khan Arrested: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक; Drugs प्रकरणामध्ये NCB ची मोठी कारवाई)

एनसीबीने गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुज जहाजावर छापेमारी केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि सात अन्य लोकांना रविवारी अटक करण्यात आले. एनसीबीला सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार, जहाज दोन दिवसानंतर शहरात परतले आहे. तर अधिकारी टर्मिनल येथे पोहचले आणि त्यांनी तपास सुरु केला असून तो अद्याप सुरुच आहे.

मुंबई कोर्टाने असे म्हटले की, आर्यन खान, सेठ मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यावर 8C, 20, 27,&35 NDPS कायदे लागू करण्यापूर्वी ASG अनिल सिंग हे एनसीबी मध्ये दाखल झाले होते. आणखी 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले. एनसीबीने आरोपींना 9 दिवसांची कोठडी सुनावली आहे.(Aryan Khan याची कोठडी वाढणार का? NCB काय करणार मागणी?)

Tweet:

दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एनसीबीच्या एका टीमने आपल्या क्षेत्रातील निर्देशक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संध्याकाळी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुज जहाजावर छापेमारी केली. यामध्ये काही प्रवाश्यांकडे अंमली पदार्थ मिळाले. या छापेमारीत 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एस्क्टेसीच्या 22 गोळ्यांसह 1.33 लाख रुपये जप्त केले गेले.

क्रुज कंपनीने रविवारी असे म्हटले की, त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. वॉटरवेज लीजर टूरिज्म प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष जुर्गन बेलोम यांनी एका विधानात असे म्हटले की, कॉर्डियल क्रुजचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात या घटनेशी कोणताही संबंध नाही. कॉर्डियल क्रुज आपल्या जहाजाला एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्ली स्थित एका इवेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्यावर दिले होते.