Farhan Akhtar आणि Arjun Tendulkar (संग्रहित संपादित प्रतिमा)

क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरचे (Arjun Tendulkar) आता क्रिकेट विश्वात आगमन झाले आहे. नुकतीच मुंबई इंडियन्समध्ये त्याची निवड झाली आहे. मात्र या निवडीनंतर अर्जुन नेपोटिझमबाबत (Nepotism) ट्रोल होत आहे. काही लोक म्हणत आहेत की अर्जुन तेंडुलकरची निवड तो फक्त सचिनचा मुलगा असल्याने झाला झाली आहे, तर काहीजण अर्जुन तेंडुलकरला सपोर्ट करीत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता फरहान (Farhan Akhtar) अख्तरही अर्जुन तेंडुलकरच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. फरहान अख्तरने ट्विट केले आहे की, अर्जुनबाबत नेपोटीझम शब्द वापरणे चुकीचे आहे.

फरहान अख्तरने ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, 'मला वाटते की हे मी अर्जुन तेंडूलकरबद्दल बोलायला हवे. आम्ही बर्‍याचदा एकाच जिममध्ये वर्कआउट करतो आणि मी पाहिले आहे की तो आपल्या फिटनेसवर किती कठोर परिश्रम घेत आहे. त्याचे लक्ष्य हे एक चांगला क्रिकेटपटू बनण्याचे आहे हे मी पाहिले आहे. त्यामुळे अर्जुनसाठी 'नेपोटिझम' हा शब्द वापरणे अयोग्य आणि क्रूर आहे. त्याच्या उत्साहाचा खून करू नका आणि सुरु होण्याआधीच त्याच्यावर ट्रोलिंगचा मारा करून त्यांना खाली खेचू नका.'

गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांच्या बोलीसह आपल्या संघात जागा दिली आहे. अर्जुनाची निवड झाल्यापासून पुन्हा एकदा नेपोटिझमबाबत वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर लोक अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवर टीका करीत आहेत, ते म्हणतात की तेंडूलकर या आडनावामुळेच अर्जुनला मुंबईच्या संघात सहज जागा मिळाली. (हेही वाचा: IPL 2021 Auction: अर्जुन तेंडुलकरला खरेदी करण्यामागे काय आहे कारण? पहा काय म्हणाले Mumbai Indians प्रशिक्षक महेला जयवर्धने)

यासह, अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरनेही ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 23 वर्षीय सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, 'तुझ्याकडून हे यश कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. हे तुझे यश आहे, मला तुझा अभिमान आहे.'