प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात सर्वचजण अगदी आशेने करतात. नव वर्ष नवीन उमेद देतं. तसंच नवं वर्षात सारं काही सुरळीत होणार अशी आशा प्रत्येकाच्या मनी असते. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगासह भारतालाही ग्रासले असल्याने नववर्षाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. यामुळे सर्वांचेच जीवनाची गती मंदावली असून मनात कोरोनाच्या संकटाची चिंताही आहे. सध्याची संपूर्ण जगासह देशातील परिस्थिती पाहता महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी 2020 हे वर्ष डिलीट करता येईल का? असे विचारले आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "आपण 2020 हे वर्ष डिलीट करुन पुन्हा रिइन्टॉल करु शकतो का? कारण या व्हर्जनमध्ये व्हायरस आहे."
अमिताभ बच्चन ट्विट:
T 3484 - " Can we please delete the 2020 year and then reinstall it anew ?
This version is with virus !" ~ Ef j
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 29, 2020
युजरचे उत्तर:
अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवर एका युजरने मजेशीर उत्तर दिले आहे. डोरिमॉनला विचारतो डिलीट करण्याचे असे कोणते गॅजेट आहे का?
T 3484 - " Can we please delete the 2020 year and then reinstall it anew ?
This version is with virus !" ~ Ef j
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 29, 2020
दरम्यान कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीत अनेक सेलिब्रेटी मदत निधी जमा करत आहेत. अक्षय कुमार (Akshay Kumar), ऋतिक रोशन (Hrithik Roshan), रजनीकांत (Rajinikanth) यांच्यासह अनेकांनी सढळ हस्ते मदत केली आहे. त्यामुळे तुम्ही काही मदत करणार नाही का, असा प्रश्न बिग बींना विचारला जात आहे. या प्रश्नांना अमिताभ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. आपला जुना फोटो शेअर करत ते एका कवितेच्या माध्यमातून व्यक्त झाले.
T 3484 -एक ने दिया और कह दिया,कि दिया,
दूसरे ने दिया और कहा नहीं,कि दिया,
दूसरी श्रेणी में ही रहने दो मुझे ऐ प्रीयजन
जिसे मिला, वो क्या जाने किसने दिया; जानो उसका बस करुण क्रंदन।
इन हालातों में और क्या कहा जाए ,
जो जानें मुझे,जानें, मैं तो सदा स्वभाव से ही रहा हूँ कमसुख़न ! pic.twitter.com/0S8uRBOVIC
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 29, 2020
याचा अर्थ असा की काहीजण दान करतात ते सांगतात. काहीजणांना त्याचा गवगवा करायला आवडत नाही. मी त्यापैकी एक आहे. ज्याला ते दान मिळते त्याला काय ठाऊक की कोणी दिले. त्याला तर आपल्यावर आलेल्या संकटाची चिंता असते. या परिस्थितीत मी अजून काय बोलू. जे मला ओळखतात त्यांना मी कसा आहे ते ठाऊक आहे, अगदी साध्या शब्दांत बिग बींनी लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे.